Sanjay Dutt On Cancer Battle : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली असली तरी त्याची मरण्याची इच्छा होती. 


संजय दत्त गेल्या वर्षी 'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमात झळकला होता. त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत संजयने त्याच्या कर्करोगाच्या प्रवासासंदर्भात भाष्य केलं आहे. संजय दत्त म्हणाला,"केजीएफ 2' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मला पाठदुखीचा त्रास होत होता. 


'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान पाठदुखीचा त्रास होत असल्याने मी औषधं आणि गरम पाणी पित असे. त्यानंतर एकेदिवशी मला श्वसनाचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी डॉक्टांकडे गेलो. त्यावेळी त्यांनी मला कर्करोगाने पीडित असल्याचं सांगितलं. पण मला केमोथेपरी घ्यायची नसल्याने मी आयुष्य संपवण्याची इच्छा व्यक्त केली. 






संजय दत्त पुढे म्हणाले,"कर्करोगाचा जुना इतिहास आहे. माझी आई नर्गिसचंदेखील कर्करोगामुळे निधन झालं होतं. तसेच माझी पहिली पत्नी रिचा शर्मानेदेखील ब्रेस्ट कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. पण मला कर्करोग झाला तेव्हा माझी पत्नी मान्यता दत्त आणि बहिण प्रिया आणि नम्रता दत्त यांनी माझी खूप काळजी घेतली. डॉक्टरांच्या मदतीमुळे मी या गंभीर आजारावर मात करू शकलो. 


संबंधित बातम्या


Sanjay Dutt: 'खलनायकच्या सिक्वेलमध्ये रणवीरने काम करु नये'; असं का म्हणाला संजय दत्त?