मुंबई : चित्रपट अभिनेता संजय दत्तने ट्विटरवर कर्करोगा विरोधात लढाई जिंकल्याची घोषणा केली. तुम्हा सर्वांना ही आंनदाची बातमी सांगताना माझं मन कृतज्ञतेने भरून गेलंय. मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचं संजय दत्तने म्हटलं आहे.


ऑगस्टमध्ये संजय दत्तला अॅडवान्स स्टेजचा फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. यानंतर संजय दत्त अनेकवेळा मुंबईच्या लीलावती आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी येत जात होता.




मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता. परंतु ते म्हणतात ना देव जास्त संकटं ही सर्वात शक्तिशाली लोकांच्याच वाट्याला देतो. आज माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीचं मी या लढाईतून विजयी झाल्याने मला आनंद झाला आहे. हे तुमच्या समर्थनाशिवाय शक्य झालं नसतं. संकट काळात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेले माझं कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचा मनापासून आभारी आहे. माझ्या प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार. खासकरुन कोकिलाबेन रुग्णालयातील डॉ. सेवंती आणि तिच्या टीमचे मनापासून मी आभार मानतो. ज्यांनी माझी खूप काळजी घेत मला यातून बाहेर काढले, असे निवेदन संजय दत्तने आपल्या सोशल अडाऊंटवर शेअर केलं आहे.


याअगोदरचं मित्राने केला होता दावा


संजय दत्त आता पूर्णपणे कर्करोगमुक्त झाल्याची माहिती गेल्या चार दशकांपासून संजय दत्तचा निकटवर्ती मित्र आणि चित्रपट वितरण क्षेत्रातील नामांकित राज बंसल यांनी एबीपी न्यूजशी बोलताना मंगळवारी ही माहिती दिली होती. त्यानंतर खुद्द संजय दत्तनेच ही माहिती दिली आहे.