मुंबई : " माझं आंग उन्हानं भाजतंय, कानाखाली जाळ काढीन तुझ्या.....मेव्हणा म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय, सहनही होतं नाही आणि सांगताही येत नाही...चिंबलेल्या बांबूने फोकलून काढला पाहिजे याला," हे मकरंद अनासपुरेचे डायलॉग अभिनेता संजय दत्तच्या तोंडी पाहायला मिळणार आहे. कारण गावरान डायलॉग आणि दमदार कथेने गाजलेले दे धक्का हा सिनेमा लवकरच हिंदीत येत आहे.


 

दिग्दर्शक महेश मांजरेकर हे संजय दत्तला घेऊन दे धक्का सिनेमाचा रिमेक करणार आहेत.

 

महेश मांजरेकर आणि संजय दत्त यापूर्वी वास्तव या गाजलेल्या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाले होते. मात्र आता ही जोडी 'दे धक्का'मुळे पुन्हा दिसणार आहे.

 

मी आणि संजय दत्त चांगले मित्र आहोत. प्रेक्षक अजूनही आमचा वास्तव सिनेमा विसरलेले नाहीत. त्यामुळे मला वाटतं 'दे धक्का' आमच्यासाठी एक चांगला सिनेमा ठरेल.

 

दे धक्का सिनेमाच्या शुटिंगला डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. संदीप सिंह आणि उमंग कुमार यांच्या लिजेंड स्टुडिओ या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

 

मराठी 'दे धक्का'मध्ये मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा, सक्षम कुलकर्णी, गौरी वैद्य यांची भूमिका आहे.

 

त्यामुळे मकरंदची भूमिका संजय दत्त साकारत असला, तरी सिद्धार्धने साकारलेला धनाजीराव कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.