‘धूम 5’मधून आर्यनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 03:23 AM (IST)
मुंबई : बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन ‘धूम 5’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी शाहरुने सांगितलं होतं की, आर्यन लवकर फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेणार आहे. शाहरुखने आर्यनच्या बॉलिवूड करिअरबद्दल जाहीरपणे कधी वक्तव्य केलं नाही. मात्र, चर्चा अशी आहे की, फिल्म स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्यन बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ‘धूम 4’ सिनेमासाठी रणवीर सिंह आणि सलमान खान यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप नावांवर शिक्कामोर्तब झालं नाही. आर्यनच्या बॉलिवूड एन्ट्रीबाबत बोलताना एकदा शाहरुख म्हणाला होता, “आर्यनला फॉलिंग डाऊन, अनटचेबल्स, जाने भी दो यारो, शोले, देवदास, यांसारखे क्लासिकल सिनेमे दाखवतो.”