Sandeep Pathak : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. सध्या संदीप हे त्यांच्या ‘राख’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. 15 देशांचे 54 चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.


‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक सांगतात.


संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबाबत माहिती दिली. पाहा त्यांची पोस्ट:






'राख' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  रंगा पतंगा, डबल सीट आणि पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये संदीप यांनी काम केलं आहे. या चित्रपटातील संदीप यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांच्या वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: