Karthikeya 2 : कार्तिकेय 2 (Karthikeya 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत.  कार्तिकेय 2  या चित्रपटात साऊथ सुपरस्टार निखिल सिद्धार्थनं प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी कार्तिकेय 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. 


कार्तिकेय 2 हा चित्रपट भगवान श्रीकृष्णाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. साऊथ सिनेमाचा सुपरस्टार निखिल सिद्धार्थने या सिनेमात जबरदस्त काम केले आहे.  तरण आदर्श यांनी कार्तिकेय 2 च्या हिंदी व्हर्जननं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कार्तिकेय 2 ने 16 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.77 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कार्तिकेय 2 ने 3.42 कोटींचे कलेक्शन केले आहे. 


कार्तिकेय 2 ची आतापर्यंतची कमाई
दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कार्तिकेय 2 नं मोठी झेप घेतली. ज्यामुळे चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, हे लक्षात घ्यावे की  कार्तिकेय 2 च्या हिंदी व्हर्जननं  23.53 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचप्रमाणे, जगभरात अभिनेता निखिल सिद्धार्थच्या कार्तिकेय 2 ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 






कार्तिकेय 2 या सिनेमात निखिल सिद्धार्थ  आणि अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन  मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांसह अनुपम खेर, विवा हर्षा आणि आदित्य  महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चंदू मोंदेती  यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Karthikeya 2 : 'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट; द्वारका नगरीतील रहस्यांचा होणार उलगडा