Sanam Teri Kasam Re Release : बॉलिवुडमध्ये सध्या जुने चित्रपट नव्याने रिलीज करण्याचा ट्रेंड आला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज चित्रपट री-रिलीज करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही चित्रपटांनी तर भरभक्कम गल्ला जमवला आहे. यात तुंबाड यासारख्या नामी कलाकृतींचा समावेश आहे. दरम्यान, आता सनम तेरी कसम या री-रिलीज झालेल्या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करताना दिसतोय. 

सनम तेरी कसम चित्रपट री-रिलिज

फेब्रुवारी महिन्याच्या 7 तारखेला हिमेश रेशमिया याचा बॅडएस रविकुमार आणि जुनैद खान यांचा लव्हयापा हे दोन्ही नवेकोरे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याच दिवशी साधारण 9 वर्षांपूर्वी रिलीज झालेला समन तेरी कसम हा चित्रपट याच दिवशी नव्याने रिलीज करण्यात आला. खास बाब म्हणजे सनम तेरी कसम या चित्रपटाला बॅडएस रविकुमार आणि लव्हयापा या दोन्ही चित्रपटांपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई हा चित्रपट पाहणे पसंद करत आहे. 

2016 साली झाला होता प्रदर्शित

याआधी अनेक बडे चित्रपट री-रिलीज करण्यात आले आहेत. यात पद्मापत, यह जवानी है दिवानी, करण अर्जुन यासारख्या मोठ्या चित्रपटांचा यात समावेश आहे. मात्र सनम तेरी कसम या चित्रपटाने री-रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा गल्ला जमवला आहे. ही कमाई पाहून चित्रपटाचे निर्माते चांगलेच खुश झाले आहेत. हा चित्रपट याआधी 2016 साली प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने रि-रिलीजमध्ये आपला जुना विक्रम मोडला आहे. 

चित्रपटाने नेमकी किती कमाई केली? 

सॅकनिल्कच्या ताज्या रिपोर्टनुसार सनम तेरी कसम या चित्रपटाच्या कमाईत री-रिलीजच्या दुसऱ्या दिवशी साधारण 15 टक्क्यांनी वाढ झाली. या चित्रपटाने रि-रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपये कमवले. री-रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 9 कोटी रुपये गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने दोन दिवसांत कमाईच्या बाबतीत बॅडएस रविकुमार आणि लव्हयापा या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे.

9 वर्षांपूर्वी चित्रपट ठरला होता फ्लॉप

सनम तेरी कसम हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकूण 18 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी या चित्रपटाने फक्त 9.10 कोटी रुपये कमवले होते. आता री-रिलीजमध्ये या चित्रपटने दोनच दिवसांत 9 कोटी रुपये कमवले आहेत. 

हेही वाचा :

Amitabh Bachchan : 'जाण्याची वेळ झालीय...'; अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टने एकच खळबळ, चाहते चिंतेत

प्रसिद्ध गायक-संगीत दिग्दर्शक प्रीतमच्या ऑफिसमध्ये चोरी, 40 लाखांची रोकड घेऊन ऑफिस बॉय पसार

VIDEO : उदित नारायण यांचा आणखी एक किसिंग व्हिडीओ व्हायरल; 'बुढापे में जवानी' अन् 'सीरियल किसर', नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप