Amitabh Bachchan Viral Post : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांची सोशल मीडियावर पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी अलिकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. चाहते अमिताभ बच्चन यांच्यासाठी चिंता व्यक्त करत आहे. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या व्हायरल पोस्टमुळे प्रचंड चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. आता त्यांच्या नवीन पोस्टमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बिग बींच्या पोस्टने सर्व चाहत्यांना चिंतेत टाकलं आहे.


अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टने एकच खळबळ


सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा चित्रीकरणात व्यस्त असले तरी ते दररोज एक ब्लॉग लिहितात आणि त्यांच्या एक्स हँडलवरून लोकांना आयुष्यातील अपडेट्स देत राहतात. ते ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना चाहत्यांसोबत शेअर करतात. तसेच त्यांचे विचारही शेअर करतात. अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. बिग बींची ही नवीन पोस्ट पाहून त्यांचे चाहते नाराज झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर चिंता व्यक्त केली आहे.


"जाण्याची वेळ झाली आहे"


अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी रात्री एक पोस्ट केली होते. त्यांनी 7 फेब्रुवारी 2025 च्या रात्री 8.34 वाजता त्यांच्या एक्स हँडलवर हे पोस्ट केली. यापोस्टमुळे चाहते घाबरले आहेत आणि सोशल मीडियावर कमेंट करत नक्की काय चाललंय, ते विचारत आहेत. या पोस्टमुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, बिग बी ठीक आहेत ना? अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, "जाण्याची वेळ आली आहे". ही पोस्ट पाहिल्यानंतर बिग बींचे चाहते नाराज झाले आहेत. लोक कमेंट करत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत आहेत.


अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल






चाहत्यांची प्रतिक्रिया काय?


ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सध्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपतीच्या सीझन 16 चे होस्टिंग करत आहेत. व्हायरल ट्वीमध्ये बिग बी केबीसी 16 चं शूटिंग पूर्ण करु जाण्याबद्दल बोलत आहेत. बिग बी दर रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडतात. बिग बी अनेक वर्षांपासून हे करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


घरीच पहिली डेट अन् पहिलं KISS; दोन दिवस घराबाहेर पडले नव्हते अमृता-सैफ; मुलाखतीत सांगितला रंजक किस्सा