Samrat Prithviraj : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 'सम्राट पृथ्वीराज'चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. 


सिनेमा पाहिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी लगेचच हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली. योगी आदित्यनाथ यांनी याआधी 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमादेखील उत्तरप्रदेशमध्ये करमुक्त केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाच्या कथानकाचे कौतुक केले आहे. प्रतिष्ठेच्या चौकटीत महिलांचे स्वातंत्र्य काय असू शकते हे 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात दाखवण्यात आले आहे. 






कलाकारांची फौज!


चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय आणि मानुषीशिवाय या चित्रपटात सोनू सूद (Sonu Sood), संजय दत्त (Sanjay Dutt), आशुतोष राणा (Ashutosh Rana), मानव विज (Manav Vij), साक्षी तन्वर (Sakshi Tanwar), ललित तिवारी (Lalit Tiwari) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.


टीका आणि विरोधामुळे बदलले सिनेमाचे नाव


प्रचंड टीका आणि विरोधामुळे, निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. आता या ऐतिहासिक सिनेमाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी नुकतीच दिली होती. अधिकृतपणे चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, निर्मात्यांनी सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज केले होते. 


3 जूनला होणार प्रदर्शित


‘सम्राट पृथ्वीराज’ हा सिनेमा 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.


संबंधित बातम्या


Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज; महिलांच्या सन्मानाबद्दल अक्षय कुमार म्हणाला...


Samrat Prithviraj : अमित शाहांकडून 'सम्राट पृथ्वीराज'चं कौतुक; सिनेमा पाहिल्यानंतर पत्नीला म्हणाले, 'चलिए हुकुम'