Mahesh Babu Daughter Sitara Fees: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) आणि नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) यांची मुलगी सितारा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सितारा घट्टामनेनी ही काही दिवसांपूर्वी टाइम्स स्क्वेअरवर झळकली. तिने एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. जे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आले. या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटसाठी सितारानं किती मानधन घेतले? याबाबत जाणून घेऊयात...
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा ही वयाच्या 11 व्या वर्षी टाइम्स स्क्वेअरवर झळकली आहे. सिताराने एका ज्वेलरी ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. या ब्रँडची सितारा ही अॅम्बेसेडरही झाली आहे. या ज्वेलरी ब्रँडच्या फोटोशूटसाठी सिताराने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
सिताराचे हे फोटोशूट 4 जुलै रोजी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दाखवण्यात आले होते. टाइम्स स्क्वेअरवरील सिताराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच सितारा ही महेश बाबूच्या ‘सरकरू वारी पाटा’ या गाण्यामध्ये देखील दिसली.
महेश बाबूचे चित्रपट
सध्या अभिनेता महेश बाबू हा त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या 'गुंटूर करम' या अॅक्शन ड्रामा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 13 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये अभिनेता महेश बाबूसोबत लग्नगाठ बांधली. वास्तव, पुकार, कच्चे धागे, हेरा फेरी यांसारख्या चित्रपटांमध्ये नम्रतानं काम केलं आहे. पण लग्नानंतर नम्रतानं चित्रपटांमध्ये काम केलं नाही. एका तेलगू युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रतानं तिच्या करिअरबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'महेशचा विचार स्पष्ट होता. त्याला काम न करणारी म्हणजेच नॉन वर्किंग पत्नी पाहिजे होती. जरी मी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असले असते, तरी देखील महेशनं मला काम सोडायला सांगितलं असतं. '
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'