Sambhaji Bhagat On Gautami Patil : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला असून गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील आडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी आपला मत व्यक्त केलं आहे. 


शाहीर संभाजी भगत यांनी गौतमीचं नाव न घेता म्हटलं आहे की,"नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण... ती आपल्यापेक्षा खालच्या जातीची पाहिजे...नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये. आजपर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्यातला जात्यंध पुरुष दुखावतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे. पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही. मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे लागणे हेच मुळापासून बंद व्हावे असे का वाटत नाही? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत?". 



संभाजी भगत यांनी पुढे लिहिलं आहे,"मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे. भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच, पण ते जात्यंधसुद्धा आहेत. म्हणून बलात्कारित स्त्रीकडेसुद्धा ते अशाच घाणेरड्या पद्धतीने बघतात. तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे ठरवतात. दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्यापेक्षा खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात. बलात्कार हे हत्यार म्हणूनसुद्धा वापरतात". 


संभाजी भगत म्हणाले,"स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच. पण आडनाव बदलून नाचा असे ज्या बाईला सांगितले जाते. तिनेसुद्धा याबाबत स्पष्टपणे व्यक्त व्यायला हवे". संभाजी भगत यांच्या पोस्टवर नाचणाऱ्या बायका या खालच्या जाती वर्गातील असाव्यात, अशी अपेक्षा आणि धारणा असणे हे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील वास्तव आहे. पुरुषांनी जातीय मानसिकता बदलणे आवश्यक आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Gautami Patil : गौतमी पाटीलने आक्षेप घेणाऱ्यांना ठणकावून सांगितले, 'मी पाटील आहे आणि हे नाव मी वापरणारच!