मुंबई : सेलिब्रिटींचं आयुष्य कायमच चर्चेत असतं. प्रसिद्धीझोतात असलेल्या कलाकारांच्या आयुष्यातही अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिच्या आयुष्यातही गेल्या काही वर्षात खूप चढउतार आले. समंथासाठी गेली तीन वर्षे चांगली नव्हती. आधी घटस्फोट आणि नंतर मायोसिटिससारख्या गंभीर आजाराविरुद्ध तिने एकट्याने लढा दिला. या तीन वर्षांतील संकटे आणि परिस्थितीवर तिने आता मौन सोडलं आहे. समंथाने सांगितलं की, आगीतून बाहेर पडली आहे. हे सर्व तिच्यासाठी सोपं नव्हते. आयुष्यातील तिच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ असल्याचं तिने म्हटलं आहे. 


घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर समंथाने व्यक्त केलं दु:ख


अभिनेत्री समंथा रुथू प्रभूने गेल्या तीन वर्षांतील तिच्या आयुष्यातील संकटांवर चर्चा केली. हा काळ तिच्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या फार खडतर होता. पण, यातून ती अखेर बाहेर पडली आहे. समंथा रुथ प्रभूने अलीकडेच एले इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं आहे. यादरम्यान तिने सांगितलं की, प्रत्येकाला आयुष्यातील कोणती न कोणती गोष्ट बदलायची असते. या संकटांमधून जाण्याची आपल्याला खरंच गरज आहे का, असंही वाटतं. पण, एका वेळेनंतर मागे वळून पाहिल्यावर याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचंही तिने म्हटलं आहे.


मला आगीतून जावं लागलं आहे


समंथाने सांगितलं की, ती आज जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी तिला आगीतून जावं लागलं आहे. आपल्या सर्वांनाच आपल्या आयुष्यात काही ना काही बदल करायचे असतात. कधी-कधी असं वाटत की, आपण जे सहन करतोय, त्या संकटातून जाण्याची खरंच गरज आहे का? पण मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आयुष्य आपल्यासमोर जी काही संकटे घेऊन येतो, त्यातून मार्ग काढणं म्हणजेच तुमचा विजय


...त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता


समंथा पुढे म्हणाली की, "गेला काळ पाहता, मागे वळून पाहिलं तर ही परिस्थिती नकोशीच वाटते. काही काळापूर्वी मी माझ्या मैत्रिणीशी याबद्दल चर्चा करत होते. यावेळी वाटलं की, गेली तीन वर्षे अशीच जायला हवी, असं मला अजिबात वाटत नाही. पण, आपल्याला आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला सामोरं जावंच लागतं आणि त्यातून बाहेर पडल्यावर आपण जिंकलो, असे आपल्याला वाटतं. मी स्वत:ला पूर्वीपेक्षा अधिक कणखर आणि भक्कम असल्याचं मला वाटत आहे, कारण मी इथे पोहोचण्यासाठी आगीतून गेली आहे. आजच्या काळात दु:ख, वेदना आणि आजार वाढले आहेत, त्यामुळे अध्यात्मिक असणे अधिक गरजेचे असल्याचंही समंथाने सांगितलं. तिने अध्याम आता आपला मित्र असल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bad Newz : विक्की-तृप्तीच्या 27 सेकंदांच्या Kissing सीनमध्ये बदल, बॅड न्यूज चित्रपटावर सेन्सॉरची कात्री