Janhvi Kapoor Ulajh Movie : अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Actress Janhvi Kapoor) आगामी उलझ (Ulajh Trailer Out) चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. उलझ चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशु सरिया (Sudhanshu Saria) यांनी दिग्दर्शित केला आहे. राझी, बधाई हो आणि तलवार यासारख्या दमदार चित्रपटाच्या निर्मात्यांनी उलझ चित्रपट बनवला आहे. उलझ चित्रपट येत्या 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुलशन देवैया, रोशन मैथ्यू, राजेश तेलंग आणि मियांग चांग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


जान्हवी कपूर बनली IFS ऑफिसर


जान्हवी कपूरने उलझ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्याची (Indian Foreign Service) भूमिका बजावताना दिसत आहेत. ट्रेलर शेअर करताना जान्हवीने लिहिलं आहे, 'प्रत्येकाची एक कथा आहे. प्रत्येक कथेत रहस्यं दडलेली असतात. प्रत्येक रहस्य एक सापळा आहे. हा संभ्रम सोडवणं सोपे जाणार नाही. उलझ ट्रेलर आता रिलीज झाला आहे.'


'उलझ' चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर


ट्रेलरची सुरुवात जान्हवी कपूरपासून होते. ट्रेलरमध्ये जान्हवीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. उलझ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी सुहाना भाटिया या देशातील सर्वात तरुण डेप्युटी हाय कमिशनरच्या भूमिकेत दिसत आहे. सुहानावर 'नेपो' किड असल्याचा आरोप होताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात सस्पेन्सने होते. भारतीय गुप्तचर माहिती लीक होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. यानंतर जान्हवी कपूरची म्हणजेच सुहाना भाटियाची एन्ट्री होते. सुहानाने सेंट स्टीफन आणि हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ती देशातील सर्वात तरुण उप उच्चायुक्त बनली आहे.


जान्हवी कपूरची इंस्टाग्राम पोस्ट



सस्पेन्स आणि ट्विस्टची रोलरकोस्टर राइड


उलझ चित्रपटात सस्पेन्स आणि ट्विस्टची रोलरकोस्टर राइड पाहायला मिळेल, असं मेकर्सने सांगितलं आहे.. या चित्रपटात सापळे, कारस्थान आणि विश्वासघात यांची चित्तथरारक कहाणी उलगडणार आहे. उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर पाहता आता चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात