Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच आपल्या सिनेमांमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने आता तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत. समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.  काही दिवसांपूर्वी समंथाची प्रकृती खालावली होती. पण आता अभिनेत्रीची प्रकृती स्थिर झाली आहे. समंथाने आता इंस्टाग्रामवर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी जगभरातील तिच्या चाहत्यांना वेड लावलं आहे. 


समंथा रुथ प्रभू लवकरच 'सिटाडेल' या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राईम व्हिडीओवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल. या सीरिजच्या माध्यमातून समंथा रुथ प्रभू धमाकेदार कमबॅक करणार आहे. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर समंथाने कामाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरदेखील ती चांगलीच सक्रीय आहे. 


समंथाचं बोल्ड फोटोशूट पाहिलंत का? (Samantha Ruth Prabhu Bold Photo)


समंथा रुथ प्रभूने नुकतच बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे बोल्ड अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. समंथाने आपले बोल्ड फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"ailed as a Disney Princess... I am a Dragon Now". समंथाची ही हटके कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.






समंथाच्या फोटोवर नेटकऱ्यांचा कमेंट्सचा वर्षाव 


समंथाने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच अल्पावधीतच ते व्हायरल झाले आहेत. समंथाने आग लावली, ही Dragon आम्हाला आवडते, फॅशन बेबी, जुन्या समंथाची आम्हाला आठवण येते, क्वीन ऑफ Dragons, खूपच हॉट दिसत आहेस, सुंदरी, डिग्नी प्रिन्सेस, कमाल कॅप्शन, सॅम तू आम्हाला आवडेस, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


समंथाने फ्लॉन्ट केलेला बॅकलेस ड्रेस


समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला बॅकलेस ड्रेस फ्लॉन्ट केला होता. या बॅकलेस ड्रेसमध्ये समंथा खूपच हॉट दिसत होती. समंथाचा प्रत्येक अंदाज किलर आणि ग्लॅमरस असतो. दिवसेंदिवस समंथा बोल्ड होत चालली आहे, असं तिच्या चाहत्यांचं मत आहे. समंथाच्या फोटोवरुन चाहत्यांनी नजर हटत नाही. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Samantha Ruth Prabhu : "मी लैगिंकतेबाबत नेहमीच..." समंथा रुथ प्रभूच्या विधानाने चित्रपटसृष्टी हादरली