Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. समंथाने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. अशातच अभिनेत्रीच्या एका विधानाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. समंथाने 'उ अंटावा'च्या (Oo Antava) पहिल्या शॉटदरम्यानचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.


समंथा रुथ प्रभूसाठी काही काही दिवस खूप कठीण होते. अभिनेत्री ऑटोइम्यून मायोसिटिस या आजाराने ग्रस्त होती. आता या आजारातून बाहेर पडत अभिनेत्रीने काम करायला सुरुवात केली आहे. नुकतचं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आजाराबद्दल आणि लैगिंकतेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. अभिनेत्रीचं वक्तव्य सध्या चांगलच चर्चेत आहे.


समंथा रुथ प्रभू अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) सुपरहिट 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमातील 'उ अंटावा' (Oo Antava) या गाण्यावर चांगलीच थिरकली आहे. पण या सिनेमासाठी डान्स करणं अभिनेत्रीसाठी खूपच कठीण होतं. नुकतचं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं आहे. समंथा म्हणाली,"मी सुंदर दिसते असं मला स्वत:ला कधीच वाटलं नाही. मी नेहमीच स्वत:ला दुय्यम लेखत होते. इतर सुंदर मुलींसारखी मी दिसत नाही, असं मला वाटायचं. 'उ अंटावा'च्या पहिल्या शॉटदरम्यान मी भीतीने थरथर कापत होते. त्या शॉटसाठी मी तयार नव्हते. कारण सेक्सी दिसणं हे माझ्या तत्वात बसत नाही. मनामध्ये नेहमीच संशयकल्लोळ सुरु असायचा. त्यामुळे लैंगिकतेबाबत मी नेहमीच Uncomfertable राहिली आहे. पण या गाण्यानंतर मी अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणूनदेखील समृद्ध झाले. स्वत:ला अडचणीत टाकण्याचा नेहमीच मी प्रयत्न केला आहे".  






अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' (Pushpa) या सिनेमातील 'उ अंटावा' या गाण्याने धुमाकूळ घातला. समंथाचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. वरुण धवनच्या (Varun Dhawan) आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री दिसणार आहे. तसेच एका हॉलिवूड चित्रपटाचाही अभिनेत्री भाग आहे.


समंथा रुथ प्रभूबद्दल जाणून घ्या... (Samantha Ruth Prabhu Details)


समंथा रुथ प्रभू लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेलुगू आणि तामिळ सिनेमांत तिने खूप नाव कमावलं आहे. 'ये माया चेसावे' या सिनेमाच्या माध्यमातून समंथाने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. समंथाने फिल्मफेअर पुरस्कारदेखील पटकावले आहेत. समंथाचा 'खुशी' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.


संबंधित बातम्या


OTT Debut 2024 : सारा अली खान, अनुष्का शर्मा ते ऊर्मिला मातोंडकर; ओटीटीवर राज्य करण्यास बॉलिवूड अभिनेत्री सज्ज!