Marco OTT Release : 2024 मध्ये रिलीज झालेल्या मार्को या मल्याळम चित्रपटाने पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवला. अभिनेता उन्नी मुकुंदन याचा 'मार्को' चित्रपट 2024 मधील अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट ठरला. इतकंच नाही तर, या चित्रपटाला भारतातील सर्वात हिंसक चित्रपटाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतीत पुष्पा अन् अ‍ॅनिमल चित्रपटही फिके पडले. 20 डिसेंबरला मार्को चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर धमाका केला.  हनीफ अदेनी दिग्दर्शित 'मार्को' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा सर्वत्र त्याचीच चर्चा होती. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. 'मार्को' चित्रपटाची कहाणी कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन आणि स्क्रिनप्ले सर्वच गोष्टींचं भरभरुन कौतुक झालं.


2024 चा भयानक अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट


30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'मार्को' या मल्याळम चित्रपटाने तिप्पट कमाई केली. या चित्रपटाने भारतात 60.27 कोटींचा गल्ला जमवला तर जगभरात 102.55 कोटींची कमाई केली. यामुळे हा चित्रपट 2024 चा ब्लॉकबस्टर हिट ठरला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. भारतातील सर्वात हिंसक चित्रपट आता लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. लवकरच प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे दरम्यान, हिंदी प्रेक्षकांना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण हिंदी भाषिकांना हा चित्रपट अजूनही सबटायटल्सवरच पाहावा लागणार आहे.


'या' चित्रपटासमोर पुष्पा आणि अ‍ॅनिमलही फिकी


'मार्को' हा चित्रपट हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिखाईल' चित्रपटाचा एक स्वतंत्र स्पिनऑफ आहे. जरी दोन्ही चित्रपट एकमेकांशी थेट जोडलेले नाही, मात्र 'मिखाईल' चित्रपटामधील काही पात्रे मार्कोमध्येही एकाच स्वरूपात दाखवण्यात आली आहेत. ही कथा मार्को आणि अदत कुटुंबाची आहे, जे केरळमधील सोने माफियांवर राज्य करतात.


मार्को 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज होणार


बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता 'मार्को' च्या ओटीटीवर येण्यास सज्ज आहे. 'मार्को' च्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म SONY lIV वर प्रसारित होईल. SONY lIVने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याची घोषणा करताना लिहिलंय, 'मल्याळम सिनेमातील सर्वात मोठा अ‍ॅक्शन थ्रिलर येत आहे! 14 फेब्रुवारी रोजी सोनी LIV वर स्ट्रीमिंग होणारे मार्कोसोबत अ‍ॅड्रेनालाईन वाढवणाऱ्या अनुभवासाठी सज्ज व्हा.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :


VIDEO : जेव्हा उदित नारायण यांनी स्टेजवरच श्रेया घोषाल अन् अलका याज्ञिक यांनाही केलं होतं KISS...; जुना व्हिडीओ व्हायरल