Salman Khan Using Glasses Viral Video : बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. चाहते त्याच्याबद्दलची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आतूर असतात. सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्याच्या चिंतेत भर पडली आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानची दृष्टी कमकुवत झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना फार वाईट वाटत आहे. मेगास्टार हळूहळू म्हातारा होतोय, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.
सलमान खानचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या चिंतेत भर
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा एक व्हिडीओ (Viral Video) पाहून चाहते चिंताग्रस्त (Shocked Fans) झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सलमान खान बरगडीच्या दुखापतीमुळे (Salman Khan Injured While Shooting) कण्हताना दिसला होता. त्याला सोफ्यावरून उठताही येत नव्हतं. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ पाहिल्यावर चाहते चिंतेत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानची दृष्टीही कमकुवत होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
भाईजाननं मीडियाला पाहताच काढला चष्मा
व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान (Salman Khan Car Viral Video) कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याने चष्मा घातला (Salman Khan Using Reading Glasses) आहे. कदाचित तो फोनमध्ये काहीतरी पाहत असावा. यानंतर मीडियाला पाहताच त्याने ताबडतोब चष्मा (Salman Khan in Reading Glasses) काढला. या सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये चित्रीत झाला असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
"टायगर बुढा हो रहा हैं..."
सलमान खानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, "टायगर बुढा हो रहा हैं." दुसऱ्याने लिहिलंय, "मेगास्टारला म्हातारं होताना पाहून वाईट वाटतंय." एकाने लिहिलंय, "आमचा हिरो म्हातारा होतोय." तिसऱ्याने लिहिलंय, "इतक्या धमक्या मिळूनही भाईजान घराबाहेर पडणं सोडत नाही." त्यावर दुसऱ्याने लिहिलंय, "रेंज रोव्हर बुलेटप्रूफ आहे." व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.
पाहा सलमान खानचा व्हायरल व्हिडीओ (Salman Khan Viral Video)
महत्त्वाच्या इतर बातम्या :