Arpita Khan Sharma: बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) हिच्या खार (Khar) येथील घरात चोरी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलीसांनी आरोपी संदीप हेगडेला अटक करून त्यानं चोरी केलेले हिऱ्याचे झुमके जप्त केले आहे. ज्याची किंमत 5 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. संदीप हेगडे हा विलेपार्ले पूर्व आंबेवाडी झोपडपट्टीतील रहिवासी आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता ही तिचा अभिनेता-पती आयुष शर्मा, मुलगा अहिल आणि मुलगी आयतसोबत खारमध्ये राहते. संदीप हेगडे हा त्यांच्या घरी नोकर म्हणून काम पाहत होता. 16 मे रोजी अर्पिता खान शर्माने हिऱ्याचे झुमके मेकअप ट्रेमध्ये ठेवले होते आणि तेथून ते बेपत्ता झाल्याचे अर्पिताने तक्रारीत म्हटले. तिने दिलेल्या तक्रारीनंतर, भारतीय दंड संहितेच्या कलम 381 (नोकराकडून चोरी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 






गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खार पोलिसांनी तात्काळ तपासासाठी टीम बनवली. चोरी झाली त्या दिवशी घरात कोणी कोणी प्रवेश केला किंवा घरात कोणाचा वावर होता या सर्व बाबींचा तपास केला. तपासानंतर संशयाची सुई घरातील नोकर संदीप हेगडे याच्यावर गेली. पोलिसांनी संदीप याला ताब्यात  घेतले.  संदीपने हिऱ्याचे झुमके चोरी केल्याची कबुली दिली. चोरीला गेलेले झुमके संदीप हेगडेच्या घरातून जप्त करण्यात आले. त्यानंतर संदीप हेगडेची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.


अभिनेता आयुष शर्मा  आणि अर्पिताने 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. आयुष शर्मा (Aayush Sharma) हा अभिनेता आहे.  काही दिवसांपूर्वी आयुष शर्माचा  ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Antim: The Final Truth) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सलमानने (Salman Khan) प्रमुख भूमिका सकारली आहे.


संबंधित बातम्या


Salman Khan Sister Arpita Story : अशी झाली होती सलमानची बहिण अर्पिताची खान कुटुंबामध्ये एन्ट्री; सलमानसाठी आहे लकी चार्म