Satyaprem Ki Katha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. कियारा आणि कार्तिक यांच्या  ‘सत्यप्रेम की कथा’  (Satyaprem Ki Kath) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. 


'सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटाचा टीझर कियारा अडवाणीने  इंस्टाग्राम अकाउंटवर  शेअर केला आहे. 'बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो. आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो आंसू उसके पर आंखे मेरी नम हो' या  कार्तिक आर्यनच्या डायलॉगनं   'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. कियारानं हा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, "आजपासून सुरु होत आहे, 'सत्यप्रेम की कथा' ". कियारानं शेअर केलेल्या या  'सत्यप्रेम की कथा'  चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


कधी रिलीज होणार 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट?



'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी  'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा टीझर 






कार्तिक आणि कियाराचे चित्रपट


कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. तर कियाराचा जुग जुग  जियो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता कार्तिक आणि कियारा यांच्या 'सत्यप्रेम की कथा'  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Bhool Bhulaiyaa 3 : "गोष्ट अजून संपलेली नाही...", कार्तिक आर्यनने शेअर केला 'भूल भुलैया 3'चा टीझर; जाणून घ्या सिनेमा कधी रिलीज होणार?