Katrina Kaif New Look From Tiger 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina kaif) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी 'टायगर 3' हा सिनेमा सज्ज आहे. आता या बहुचर्चित सिनेमातील कतरिना कैफचा (Katrina Kaif) लूक समोर आला आहे.


कतरिना कैफचा अॅक्शन मोड


'टायगर 3' या सिनेमातील कतरिना कैफचा नवा लूक समोर आला आहे. नव्या लूकचं पोस्टर अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये कतरिनाचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. कतरिनाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.






'टायगर 3' या सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. 'टायगर 3'च्या नव्या पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. या पोस्टरमध्ये कतरिना कैफने अर्थात जोयाने हातात बंदूक घेतलेली दिसत आहे. कतरिनाचं हे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. 


कतरिनाने शेअर केलं 'टायगर 3'चं पोस्टर (Katrina Kaif Shared Tiger 3 Poster) 


कतरिना कैफने 'टायगर 3' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"फायटिंग फायर विथ फायर...ही आहे जोया". कतरिनाच्या या पोस्टवर अॅक्शनची क्वीन, जोया इज बॅक, बॉलिवूडची क्वीन, आता जोयाला भेटण्याची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. कतरिनाचं हे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


'टायगर 3' कधी रिलीज होणार? (Tiger 3 Release Date)


'टायगर 3' हा सिनेमा 16 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खान, कतरिनासह इमरान हाशमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरान या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची झलकही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'टायगर 3' या सिनेमात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. हा बिग बजेट सिनेमा आता बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. सलमान-कतरिनाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येईल.


संबंधित बातम्या


'टायगर मरा नहीं, तब तक हारा नहीं'; 'Tiger 3'चा टीझर आऊट!