Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडियाडवाला हे या सिनेमाचे निर्माते आहेत. 


सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी 'जीत', 'जुडवा', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी', 'जान-ए-मन' आणि 'किक' सारख्या अनेक हिट सिनेमांत एकत्र काम केले आहे. सलमान खानसह या सिनेमात पूजा हेगडेदेखील (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. सलमान ईदच्या दिवशी सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ करणार आहे.





फरहाद सामजी हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. याआधी सलमान आणि साजिद नाडियाडवालांचा किक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे प्रेक्षक आता 'कभी ईद कभी दिवाली' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Moonfall : रोलँड एमेरिचचा 'मूनफॉल' 11 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित


Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली


Upcoming Movies : गंगूबाई काठियावाडी, गेहराईंया अन् बधाई दो; 'या' धमाकेदार चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha