Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. याआधीही एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता पोलिस तपासात बिश्नोई गँगने सलमान खानच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार, सलमान खानला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.


सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष


सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यांच्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटलं आहे की, आरोपींनी सलमान खानला मारण्याची जबाबदारी 18 वर्षांखालील मुलांना दिली होती. सर्व शूटर्स गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोईच्या ऑर्डरची वाट पाहत होते, ऑर्डर मिळताच त्यांनी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. हे शूटर पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथील असून ते गुजरातमध्ये लपून बसले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.


सलमान खानला मारल्यानंतर पळायचा प्लॅनही तयार


चार्जशीटमध्ये पोलिसांनी असेही म्हटलं आहे की, सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर आरोपींनी स्वतःचा स्किप प्लॅन बनवला होता, त्यानुसार सलमान खानला मारल्यानंतर सर्वांना कन्याकुमारी येथे एकत्र येण्यास सांगण्यात आले, तेथून सर्वांना श्रीलंकेला नेण्यात येणार होतं. भारतीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांना पुढे बोट आणि नंतर श्रीलंकेतून ज्या देशात जायचे होते, तिथे नेण्यात येणार होतं.


18 वर्षांखालील मुलांना सुपारी


पोलिस तपासादरम्यान, असे उघड झाले की सुक्खाने सलमानच्या हत्येचं काम शूटर अजय कश्यप उर्फ ​​एके आणि कटात सहभागी असलेल्या इतर चार जणांना दिलं होतं. कश्यप आणि त्यांच्या टोळीने सलमान खानच्या फार्महाऊसची पाहणी केली आणि त्याच्या सुरक्षा बंदोबस्ताची माहिती घेतली. त्याच्या कडक सुरक्षा आणि बुलेटप्रूफ वाहनांमुळे, हत्या करण्यासाठी उच्च दर्जाची शस्त्रे आवश्यक असतील, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता.


बिश्नोईच्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते शूटर्स


पुढील तपासात सुक्खाचा पाकिस्तानस्थित शस्त्र विक्रेता डोगरशी थेट संवाद झाल्याची माहिती उघड झाली. सुक्खाने व्हिडीओ कॉलद्वारे डोगरशी संपर्क साधला आणि हत्यांराच्या डीलच्या अटींवर बोलताना कपड्यात गुंडाळलेली AK-47 आणि आधुनिक शस्त्रे दाखवली. डोगरने पाकिस्तानकडून आवश्यक असलेली उच्च श्रेणीची हत्यारे देण्याचे मान्य केले होते. या हत्यारांसाठी सुक्खाने 50 टक्के ॲडवान्स पेमेंट देऊन उर्वरित रक्कम हत्यारे भारतात डिलिव्हरी झाल्यावर देण्याचं मान्य केलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग