Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोईकडून (Lawrence Bishnoi) या धमक्या दिल्या जात असल्याचं निष्पन्न होतंय. नुकतीच सलमानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्याच नावावर धमकीचा फोन आला होता. हा फोन कर्नाटकातून आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांचं एक पथक आरोपीला पकडण्यासाठी कर्नाटकाला रवाना झालं असल्याची समोर आलीये.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवार 10 नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा मेसेज दिला होता. सलमान खान सध्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे. सलमानने काळवीटाची शिकार केली म्हणून बिश्नोई गँगकडून वारंवार सलमानला निशाण्यावर धरलं जात असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच आता पुन्हा एकदा ही धमकी आता कर्नाटकातून आली असल्याचं समोर आलंय.
"सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर..."
वाहतूक नियंत्रण कक्षाला आलेल्या मेसेजमध्ये दावा करण्याता आला आहे की, संबंधित व्यक्ती गँगस्ट लॉरेन्स बिश्नोईला भाऊ आहे. धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, किंवा पाच कोटी रुपये द्यावे. असे न केल्यास आम्ही त्याला जीवे मारू. आमची गँग आजही सक्रिय आहे'. असा धमकीवजा मेसेज मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला सोमवारी मध्यरात्री आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. या प्रकरणी तपास सुरु आहे.
सलमान खान बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी नोएडा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइन क्रमांकावर अनेक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून बॉलिवूड सुपरस्टारकडून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
भाईजानला धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच
अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. 1998 मध्ये काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो, यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमानच्या घरावर या वर्षी एप्रिल महिन्यात गोळीबारही झाला होता. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमानच्या जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. या टोळीकडून धमक्या मिळण्याचं सत्र सुरुच आहे.
ही बातमी वाचा :
सलमान खानला जिवंत रहायचं असेल तर...; 'भाईजान'ला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी