Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan New Song : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता सिनेमातील 'बथुकम्मा' (Bathukamma) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.


'बथुकम्मा' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यातील सलमान खानचा लुक खूपच हटके आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील 'नय्यो लगदा', 'बिल्ली बिल्ली' आणि 'जी रहे थे हम' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता 'बथुकम्मा' हे चौथं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. 






'बथुकम्मा' या गाण्यात सलमान खान दाक्षिणात्य लुकमध्ये दिसत आहे. तेलुगू आणि हिंदीभाषेत असणाऱ्या या गाण्याची बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतदेखील चांगलीच क्रेझ आहे. भाईजानने सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"बथुकम्मा गाणं आऊट". या गाण्यात सलमानसह पूजा हेगडेदेखील दिसत आहे.


तगडी स्टारकास्ट असलेला 'किसी का भाई किसी की जान'


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे. तसेच वेंकटेश दग्गुबाती, जगपती बाबू, भूमिका चावला, अभिमन्यू सिंह, शहनाज गिल, जस्सी गिल,राघव जुयाल, सिद्धार्थ निगम आणि पलक तिवारी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून शहनाज गिल हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 


'किसी का भाई किसी की जान' कधी होणार रिलीज? (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Release Date)


'किसी का भाई किसी की जान' हा सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहाद सामजीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमासह सलमानचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


KKBKKJ Song Out : सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'मधील 'Jee Rahe The Hum' गाणं आऊट; नेटकरी म्हणाले, "पैसे वाचवण्यासाठी स्वत:चं गायला"