Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Jee Rahe The Hum Song Out : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा (Salman Khan) बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'जी रहे थे हम' (Jee Rahe The Hum) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे, हे गाणं भाईजानने स्वत: गायलं आहे. 


सलमान खानने सोशल मीडियावर 'जी रहे थे हम' या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे, "फॉलिंग वाली स्टेप कोणीतरी करुन दाखवा... प्रेमाचं माहिती नाही... पण पडायचं नक्की आहे". 'जी रहे थे हम' हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegde) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील 'जी रहे थे हम' या नव्या गाण्यात सलमान खान पूजा हेगडेला रोमॅंटिक अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. तसेच, सिद्धार्थ निगम, राघव गुयाल आणि जस्सी गिलची झलकदेखील या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्यातील सलमान आणि पूजाच्या डान्सने सर्वांना वेड लावलं आहे. 


'जी रहे थे हम' गायल्याने सलमान खान ट्रोल


'जी रहे थे हम' या गाण्याआधी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. यात 'नय्यो लगदा' आणि  'बिल्ली बिल्ली' या गाण्यांचा समावेश आहे. ही दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता या सिनेमातील 'जी रहे थे हम' हे तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या गाण्यानेदेखील चाहत्यांना वेड लावलं आहे. सलमानने गायलेलं हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे तर काहींनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांनी सलमानला ट्रोल करत कमेंट्स केल्या आहेत की, खूपच वाईट आवाज, पैसे वाचवण्यासाठी स्वत:च गाणं गायलास, गाणं ऐकल्यानंतर मीदेखील लॉरेन्स बिश्नोई झालो आहे". 


सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' कधी होणार रिलीज? 


'किसी का भाई किसी की जान' हा बहुचर्चित सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामजीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंद्र सिंह, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, जस्सी गिल आणि पलक तिवारी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमान आणि पूजाचा रोमँटिक अंदाज; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'जी रहे थे हम' गाण्याचा टीझर रिलीज