हा चिमुरडा म्हणजे नवोदित अभिनेता झहीर इक्बाल असल्याचं स्पष्ट झालं आहे. सलमानने ट्विटरवर झहीरचा फोटो शेअर केला आहे.
सलमानची सहनिर्मिती असलेल्या चित्रपटातून इक्बाल पदार्पण करणार आहे.
'ही मुलं कशी भरभर मोठी होतात. काहीही होऊदे, नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करत राहा #झहिरो.. उंच भरारी घे, पण ज्यांच्यावर प्रेम करतोस आणि ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी कायम मागे झुकत राहा. आदर आणि एकनिष्ठता या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे कायम लक्षात ठेव' असं कॅप्शन देत सलमानने झहीरचे फोटो शेअर केले आहेत.
झहीरचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमानचे खास मित्र आहेत. 'तरुणपणी इक्बाल माझी 'बँक' होते. अजूनही मी त्यांचे 2011 रुपये देणं लागतो. नशिब ते व्याज घेत नाहीत. मुलाला लाँच करत आहे, तर वडिलांचा फोटो पोस्ट करायलाच हवा ना. खूपच आवडलाय हा फोटो' असं ट्वीट सलमानने केलं आहे.
'उद्या याला लाँच करत आहे. उद्या बघुया हा मुलगा आज कसा दिसतो' असं कॅप्शन देत सलमानने हा फोटो काल शेअर केला होता. सलमानने ना कोणाला मेन्शन केलं, ना कुठला हॅशटॅग दिला. त्यामुळे चाहत्यांनी पुन्हा तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली.
झहीर आणि अभिनेत्री सना सईद एकमेकांना डेट करत असल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सना म्हणजे शाहरुख-काजोलच्या कुछ कुछ होता है (1998) मधली छोटी अंजली. सनाने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ दि इयर'मध्येही भूमिका साकारली होती.