Salman Khan : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरी जाऊन त्याचा जबाब नोंदवला. गोळीबार प्रकरणात सलमानचा जबाब नोंदवण्यात आलाय. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास सध्या क्राईम ब्राँचकडून करण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून 14 फेब्रुवारी रोजी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. 


या प्रकरणात पोलिसांनी 48 तासांच्या आत गुजरातमधून विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर 26 एप्रिल रोजी पोलिसांनी अनुज कुमार थापन आणि सोनू चंदर यांना पंजाबमधून दोघांना बंदूक पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.  याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनुज थापनने 1 मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली होती. त्यानंतर पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याला अटक करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसांना आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. 


अनुज थापनची तुरुंगात आत्महत्या


सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेला एक आरोपी अनुज थापन याने कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली होती. जेजे रुग्णालयाच्या शवविच्छेदनामध्येही त्याचा मृत्यू  गळफास लावून झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला अनुजच्या कुटुंबीयांनी मुंबईत येऊनही अनुजचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी  या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली. मात्र अनुजच्या आईची प्रकृती लक्षात घेऊन त्यांनी अनुजचा मृतदेह पंजाबला नेण्याची तयारी दर्शवली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला. 


थापनच्या कुटुंबाने केली सीबीआय चौकशीची मागणी


अनुजने तुरुंगातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर थापनच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी करत हायकोर्टाने सलमान खानला दिलासा दिला आहे. 


सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार


मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. 


ही बातमी वाचा : 


Pallavi Subhash :'सूर्य मावळत असताना...', अभिनेत्री पल्लवी सुभाषवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईच्या आठवणीत शेअर केली भावनिक पोस्ट