Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. त्याचा आवाज ऐकण्यासाठी चाहते आतुर असतात. शाहरुख खानने चाहत्यांना स्वप्न साकार करण्याच्या टिप्स दिल्या आहेत. शाहरुखचे प्रेरणादायी विचार चाहत्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करतील.
यशच्या शिखरावर पोहोचल्यावर आई-वडिलांना विसरू नका
शाहरुख खानने आपल्या करिअरची सुरुवात करण्याआधीच त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना किंग खानला आईची आठवण येते. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी आई-वडिलांना विसरू नका, असा सल्ला शाहरुखने दिला आहे.
कामात माणुसकी विसरू नका
शाहरुख खान एकदा म्हणाला होता,"दररोज सकाळी उठल्यावर काय करायचं या गोष्टीचा मी विचार करतो. त्यामुळे कोणतंही काम करताना त्यात माणुसकी विसरू नका. सकाळी उठल्यावर दररोज चांगल्या गोष्टींचा विचार करा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. इतरांबद्दल नेहमी चांगलाच विचार करा. दुसऱ्या व्यक्तीला हार मिळेल याचा विचार करू नका. फक्त मी कसा जिंकेल याचाच विचार करा.
स्वप्न साकार होण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही
तुमचं कोणतंही स्वप्न असेल तरी मेहनत न करता ते पूर्ण होऊ शकत नाही. किंग खानचादेखील यावर विश्वास आहे. एका इव्हेंटदरम्यान शाहरुख खान म्हणाला होता,"तुम्हाला ज्या गोष्टी कमवायच्या आहेत त्यासाठी पूर्ण ताकद लावा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा. स्वप्न पाहताना त्यातून लोकांचं भलं होईल की नाही याचा विचार करा.
स्वत:वर विश्वास ठेवा
शाहरुख खान म्हणतो की,"जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला जे काम करायची इच्छा आहे तेच काम मला करायचं होतं. ज्या गोष्टींतून आनंद मिळेल त्या गोष्टी करण्यावर माझा भर होता. कोणासारखं होणं ही मोठी गोष्ट नाही. स्वत:ला आनंद देण्याचा प्रयत्न करा. स्वत:ची दुसऱ्यांसोबत तुलना करू नका.
शाहरुख खानला बॉलिवूडचा 'बादशाह' असं म्हटलं जातं. आजवर त्याचे अनेक चित्रपट (Shah Rukh Khan) सुपरहिट झाले आहेत. प्रचंड मेहनतीच्या जोरावर किंग खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. आता किंग खानच्या आगामी 'किंग' (King) या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या