Salman Khan Broke Aishwarya Rai Shoulder Bone : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला एकीकडे लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी येत असताना दुसरीकडे त्याची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अली प्रसिद्धीझोतात आली आहे. सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी येत असताना सोमी अलीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सोमी अली सलमान खानबद्दल वक्तव्य करण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे.
सलमान खानची ऐश्वर्याला जबर मारहाण?
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर सोमी अलीने त्याच्याशी झूम कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सोमी अलीने लॉरेन्स बिश्नोईला भेटण्याची विनंती केली. त्यानंतर आता सोमी अलीने सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे करत अनेक आरोप करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच सोमी अलीने खुलासा केला होता की, सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना घालवलेली 8 वर्षे घालवणे तिच्यासाठी नरकापेक्षा कमी नव्हती. आता, सोमी अलीने ऐश्वर्या राय आणि सलमान खानबाबत वक्तव्य केलं आहे.
"सलमानन मोडला होता ऐश्वर्याचा हात"
सोम अलीने दावा केला आहे की, सलमानने ऐश्वर्या रायचा हात तोडला होता. सोमी अलीने अलिकडेच एका मुलाखतीत दावा केला आहे की, सलमान खानने डेटिंगदरम्यान ऐश्वर्या रायवर अनेकदा हात उचलला होता. एकदा सलमानने ऐश्वर्याला इतकी मारहाण केली होती की, तिच्या खांद्याचं हाड तुटलं होतं. पुढे ती म्हणाली की, एवढं सगळं होऊनही ऐश्वर्या रायने सलमान खानच्या कृतीबद्दल कोणालाच सांगितलं नाही. पण, त्यावेळी ऐश्वर्या रायने यापुढे सलमान खानसोबत राहणार नसल्याचा निर्णय घेतला होता.
एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा
सलमान खानने ऐश्वर्या रायप्रमाणेच सोमी अलीलाही मारहाण केली होती, असा आरोप सोमी अलीने केला आहे. सोमी अलीने पुढे सांगितलं की, सलमान खानने कतरिना कैफ आणि संगीता बिजलानी यांच्यासोबत जेवढे वाईट वर्तन केलं त्याहून वाईट वागणूक त्याने ऐश्वर्या आणि तिला दिल्याचा दावा तिने केला आहे. सोमी अली म्हणाली, एकदा सलमान खानने मला खूप मारलं होतं. तेव्हा माझी अवस्था फार वाईट होती, मी बरेच दिवस अंथरुणावरुन उठू शकत नव्हती. सोमी अलीने सांगितलं की, सध्या ती तिच्या आणि सलमान खानच्या नात्याबद्दल एक पुस्तक लिहित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :