मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार (Salman Khan House Firing Case) करणाऱ्या आरोपींपैकी एक आरोपी असलेल्या अनुज थापन याने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना चौकशीसाठी नेल्यावर या तिसऱ्या आरोपीने गळफास लावून घेतला.
इतरांना चौकशीसाठी नेल्यावर गळफास घेतला
सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याला इतर सहा आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील इतर दोन आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना गुन्हे शाखेचे पोलिस चौकशीसाठी घेऊन गेल्यानंतर आरोपीने स्वतःला गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपी अनुज थापन याने खिडकीच्या जाळीला चादर लावून गळफास घेतला.
सकाळी पोलिस राऊंडप झाला त्यावेळी सहा आरोपी कारागृहात होते. मात्र 12 वाजल्यानंतर एक आरोपी बाथरूमला गेला, त्यावेळी त्याने अनुज थापन याने गळफास घेतल्याचे पोलिसांना सांगितले. सलमान खान गोळीबार प्रकरणात अनुजची चौकशी पूर्ण झालेली नव्हती. अनुजकडून बिष्णोई गॅगबाबत अधिक महत्वपूर्ण माहिती मिळणं बाकी होते.
या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांसोबत कारागृहाची पाहणी करत आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने 25 एप्रिल रोजी सोनू चंदर (37 वर्ष) आणि अनुज थापन (32 वर्ष) यांना अटक केली होती. सोनू चंदर हा शेती करतो आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी आता अनुज थापनने तुरुंगात आत्महत्या केली आहे.
सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या सूचना
सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्या. त्यांच्याकडून 17 राऊंड जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या आरोपींनी बिहारमध्ये गोळ्या चालवण्याचा सराव केला होता. या कटात अटक करण्यात आलेल्या चौघांशिवाय आणि अनमोल बिष्णोई वगळता आणखी काहीजण सहभागी असून मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
ही बातमी वाचा: