Siddique Death: प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीक (Siddique) यांनी वयाच्या 63 या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनानं साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिद्दीकी यांनी काल (8 ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. 


रिपोर्टनुसार, सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्दीकी यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचवेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी सिद्दीकी यांना वाचवण्यासाठी  प्रयत्न केले, पण सिद्दीकी यांनी जगाचा निरोप घेतला.


सिद्दीकी यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी सलमान खानच्या 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'बॉडीगार्ड' (Bodygaurd) या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शित केला होते.


'सिद्दीक-लाल' या जोडीनं 1989 मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले.‘रामजी राव स्पीकिंग’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. याशिवाय 'हरिहर नगर' (1990), 'गॉडफादर' (1991), 'व्हिएतनाम कॉलनी' (1992), 'काबुलीवाला' (1993), आणि 'हिटलर' (1996) आणि 'बॉडीगार्ड' या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केलं.


'बॉडीगार्ड' या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनचे दिग्दर्शनही सिद्दीकी यांनी केले होते, त्या चित्रपटाचे नाव 'कवलन' होते. त्यात अभिनेता विजयने मुख्य भूमिका साकारली होती.


2020 मध्ये रिलीज झालेला बिग ब्रदर हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट सिद्दीकी यांचा शेवटचा चित्रट ठरला. या चित्रपटामध्ये  मोहनलाल, अरबाज खान, अनूप मेनन आणि हनी रोज या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.


सिद्दीक यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्दीक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता कुंचको बोबननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.






अभिनेता बेसिल जोसेफनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  सिद्दीकी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "तुम्ही आम्हाला दिलेल्या आनंदाच्या क्षणांसाठी धन्यवाद. Rest in peace sir."






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Vijay Raghavendra Wife Spandana : दाक्षिणात्य अभिनेता विजय राघवेंद्रवर कोसळला दु:खाचा डोंगर; पत्नी स्पंदनाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन