Salman Khan Trolled : ‘दबंग’ अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो. मात्र, यावेळी एका चाहत्याला भेटल्यानंतर सलमान खान जोरदार ट्रोल होतोय. नुकताच सलमान खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याने मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पोझही दिली. मात्र, यादरम्यान सलमान खानने त्याच्या एका चाहत्यासोबत असे काही केले की, लोक आता त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.


सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भियानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सलमान खान विमानतळावर स्पॉट झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, सलमान गाडीतून उतरून पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. त्याचवेळी सलमान खानचा एक चाहता त्याच्याकडे येतो. या चाहत्याच्या हातात एक फोटो फ्रेम आहे. या फोटोत सलमान आणि त्याची आई आहे.


गिफ्ट देणाऱ्या चाहत्यावर वैतागला सलमान


फोटो घेऊन येणाऱ्या चाहत्याला अभिनेत्याचा अंगरक्षक बाजूला करतो. यानंतर तो चाहता पुन्हा सलमान खानकडे येतो आणि फोटोफ्रेम देऊन सेल्फी क्लिक करतो. पण यादरम्यान, सलमान खान जरा उद्धटपणे वागतो. त्या चाहत्याकडे पाहताच त्याच्या तोंडावर वैतागलेले भाव येतात. फोटो काढताना देखील तो त्रासलेलाच वाटतो. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत आणि त्याला ट्रोल देखील करत आहेत.


पाहा व्हिडीओ :



नेटकरी करतायत ट्रोल


सलमान खानचे चाहत्यासोबतचे असे वागणे लोकांना आवडले नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलंय की, ‘मला तो पूर्वी आवडायचा, पण आता नाही.’ आणखी एकाने लिहिले की, ‘हा तोंड का वाकडं करत आहे?.’ आणखी एकाने लिहिले की, ‘हे वागणे बरोबर नाही, यांच्यामुळेच तू स्टार झाला आहेस.’ अनेकांनी सलमानच्या या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकतीच सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


हेही वाचा :