Samrat Prithviraj : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट आज (3 जून) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटाला वादाचा सामना करावा लागला, त्यामुळे निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागले होते. यासोबतच अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू शकेल का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.


चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगचा अहवाल समोर आला आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत संथ सुरुवात झाली आहे. ही कमाई कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’पेक्षा कमी आहे. या चित्रपटाची आतापर्यंत केवळ 10 हजार तिकिटे विकली गेली आहेत, जी निराशाजनक आकडेवारी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’च्या रिलीजपूर्वी 30 हजार तिकिटांची विक्री झाली होती. अशा परिस्थितीत अक्षयचा हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकणार नाही, असा अंदाज व्यापार तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.


अक्षयसाठी हा चित्रपट महत्त्वाचा!


या आधी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपटही फ्लॉप ठरला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय चमत्कार दाखवू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी हा चित्रपट पहिल्याच दिवशी 3 ते 5 कोटींची कमाई करू शकतो, असे मानले जात आहे आणि जर चित्रपट प्रेक्षकांवर काही जादू करू शकला, तर हा आकडा 8-10 कोटींच्या दरम्यान असेल.


मानुषी छिल्लरचे पदार्पण


माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर, अक्षय कुमारच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘सम्राट पृथ्वीराज’बद्दल सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे, ते पाहता अक्षयचा हा चित्रपट फारच कमाई करू शकेल असे वाटते आहे.


हेही वाचा :