बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानचा (Salman) आणखी एक ब्लॉकबस्टर, बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चीन आणि भारताच्या सीमारेषेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीनी सैन्यातील संघर्षाची ही कथा आहे. सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'ची (Battle of galwan) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जवानो याद रखे, जखम लगे तो मेडल समजना और मौत दिखे तो सलाम करना... या डॉयलॉगने या टिझरची सुरुवात होत आहे. नेटीझन्सकडून सलमानचा हा टिझर पाहताच सिनेमाची उत्कंठा आणखी वाढली आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटातील सलमान खानचा प्रभावी लूक समोर आला होता, त्याचा हा लूक पाहून चाहते अधिक उत्साही झाले. आता, भाईजान सलमानच्या वाढदिवसादिनीच त्याच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. 

Continues below advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅटल ऑफ गलवान चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. 27 डिसेंबर 2025 रोजी सलमान खानने साठीत प्रवेश केला. मध्यरात्रीपासूनच चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अपेक्षाप्रमाणे चाहते सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. या वर्षीचा वाढदिवस खास ठरला तो सलमानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' चा टीझरच्या प्रदर्शित होण्याने. "टीझरपूर्वी चित्रपटाचे पोस्टर्स 25 किंवा 26 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले. आता, अंगावर काटा आणणारा टीझर लाँच झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सलमानने या चित्रपटात कर्नल बिकुमल्ला संतोष बाबू यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शिव अरुर आणि राहुल सिंह यांचे पुस्तक 'इंडियाज मोस्ट फियरलेस 3'मधील एका चॅप्टरवर आधारीत आहे.

वरळी सी लिंकवर खास शुभेच्छा

दरम्यान, सलमान खानचा आज 60 वाढदिवस देशभरातील चाहत्यांकडून साजरा होत आहे, तर सोशल मीडियावरही त्याला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील वरळी सी लिंकवर भाईजानच्या वाढदिवसानिमित्ताने लेझर शोद्वारे सलमान खानला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या हटके शुभेच्छांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. तर, सिनेसृष्टीतील दिग्गज सेलिब्रिटीही भाईजानला 60 व्या बर्थ डेच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा

 इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या