Salman Khan Birthday: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आज (27 डिसेंबर) 60 वर्षांचा झाला. गेली साडे तीन दशके तो चित्रपटसृष्टीत कार्यरत असून अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याने कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकली असून त्याची लोकप्रियता आजही तितकीच आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Continues below advertisement

कॅटरिनाच्या शुभेच्छांनी भूवया उंचावल्या

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या कॅटरिनानं सुद्धा हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 7 नोव्हेंबर रोजी कॅटरिना आई झाली असून तिला आणि कौशलला मुलगा झाला आहे. कतरिना कैफने सलमानचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत लिहिले, “टायगर… टायगर… टायगर… या सुपरह्युमनला 60व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझं आयुष्य प्रेम आणि प्रकाशाने भरलेलं असो.” दुसरीकडे, शिल्पा शेट्टीने सलमानसोबतचे जुने-नवे फोटो शेअर करत म्हटलं, “तेव्हापासून आजपर्यंत… आणखी एक वर्ष वाढलं, पण वेड तसंच आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सलमान. नेहमी आनंदी, निरोगी राहा. आमचा कायमचा टायगर.”

Continues below advertisement

रकुल प्रीत सिंहने लिहिले, “सलमान सर, वाढदिवसाच्या शुभेच्छा. उत्तम आरोग्य, आनंद आणि यश मिळो. येणारं वर्ष नवनवीन यश घेऊन येवो.” सुनील शेट्टीने म्हटलं, “ज्याचं मन त्याच्या स्टारडमपेक्षा मोठं आहे, त्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी माणुसकी नेहमीच उजळत राहो.” ‘मैने प्यार किया’मधील सहकलाकार भाग्यश्रीने लिहिले, “तेव्हा आणि आत्ताही मैत्री तशीच आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आरोग्य, आनंद आणि शांतता लाभो.”

दिग्दर्शिका झोया अख्तरने जुना फोटो शेअर करत सलमानला आरोग्य, आनंद आणि अजून 60 वर्षे उजळ कारकिर्दीच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी एक्स (X) वर लिहिले, “आमच्या कुटुंबातील प्रिय मित्र, साधा आणि मोठ्या मनाचा सुपरस्टार सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याच्या संपूर्ण कुटुंबाला माझा मानाचा सलाम.” दिग्दर्शक सुभाष घई यांनी सलमानच्या साधेपणाचं कौतुक करत सांगितलं की, तो आजही कुटुंबाशी जोडलेला आहे, मित्रांसाठी कठीण काळात उभा राहतो आणि इतका मोठा स्टार असूनही साधं आयुष्य जगतो.

इतर महत्वाच्या बातम्या