मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या रुबाबाबद्दल वेगळं बोलण्याची गरज नाही. आपल्या मूडवर त्याचं वागणं असतं, असे अनेकदा म्हटलं जातं. कधी सलमान प्रचंड आनंदी असतो, मग काय मस्ती-मस्करी कुठल्याही मर्यादेपर्यंत सहन करतो. मात्र, कधी रागात असेल, तर तो काहीही ऐकून घेत नाही. त्याचा राग अनावर झाल्यास मग समोरच्याची खैर नाही. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका फोटो जर्नालिस्टवर सलमान कमालीचा भडकला.

 

स्पॉटबॉय डॉट कॉमच्या वृत्तानुसार, सलमान खानच्या आगामी बहुप्रतीक्षित ‘सुलतान’च्या सेटवर सलमानच्या बॉडीगार्डने एका फोटोग्राफरला फोटो काढण्यापासून रोखलं. त्यानंतरही फोटोग्राफर न ऐकल्याने बॉडीगार्डने सलमानकडे तक्रार केली. मग सलमानने फोटोग्राफरला बोलावलं. खरंतर सलमानही भडकला होता. मात्र, त्यानं रागावर नियंत्रण ठेवत शांतपणे त्याला समजावलं.

 

सलमानचं फोटोग्राफरसोबत अनेकदा वाजलं आहे. याआधी ‘किक’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान फोटो जर्नालिस्टसोबत सलमानने गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर फोटोग्राफर्सनी सलमानला बॅन केलं होतं. मात्र, अर्पिताच्या लग्नावेळी सलमानने फोटोग्राफर्सना आमंत्रण दिलं आणि प्रकरण थंड झालं होतं. मात्र, आता पुन्हा सलमान फोटोग्राफरवर भडकल्याने फोटोग्राफर्स काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.