मुंबई : शाहरुख खानच्या 'फॅन' चित्रपटाची त्याच्या फॅन्समध्ये चांगलीच हवा आहे. किंग खानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत फॅनला थंड प्रतिसाद मिळाल्याचं चित्र असलं, तरी बॉक्स ऑफिसवर सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 52.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवत 'फॅन' हा 2016 मधील हाय्येस्ट ओपनिंग वीकेंड ग्रॉसर ठरला आहे.


 
शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला फॅन 15 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजनंतरच्या पहिल्या वीकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार,रविवार या तीन दिवसांत, 2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याचा मान फॅनला मिळाला आहे.

 

 

https://twitter.com/taran_adarsh/status/721969258205356032

 
अक्षयकुमारचा 'एअरलिफ्ट' आतापर्यंत 2016 मध्ये वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. एअरलिफ्टने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला पहिल्या तीन दिवसांत कमवला होता. सोमवार ते गुरुवार या उर्वरित चार दिवसांतही चांगली कामगिरी केल्यास पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये फॅन उजवा ठरेल.

 
महेश शर्माचं दिग्दर्शन असलेल्या 'फॅन'मध्ये एसआरके मुख्य भूमिकेत असून श्रिया पिळगावकर, वलुशा डिसूजा, योगेंद्र टिकू यांच्या मुख्य भूमिकेत आहेत.