सलमानच्या जवळचा मानला जाणारा अभिनेता निखिल द्विवेदीने याबाबत ट्विटरवर दावा केला आहे. 'सलमानने कोणत्याही गायकाचं गाणं सिनेमातून वगळण्यास सांगितलं नाही, मात्र त्याने अरिजीतची भेट नाकारली आहे.' असं ट्वीट निखिलने केलं आहे.
https://twitter.com/Nikhil_Dwivedi/status/735369018962546688
'मिड डे'च्या वृत्तानुसार 'सलमानने अरिजीतने गायलेल्या गाण्याच्या व्हर्जनवरच शूटिंग केलं आहे. असं असताना तो अरिजीतनेच गायलेलं गाणं चित्रपटातून वगळायला का सांगेल. संगीतकार अनेकदा वेगवेगळ्या गायकांच्या आवाजात गाणं रेकॉर्ड करतात. त्यापैकी उत्तम गाण्याची निवड अल्बमसाठी करतात. त्यामुळे सुलतानच्या बाबतीत बोलायचं तर कोणत्या गायकाचं गाणं निवडायचं आणि कोणत्या गायकाचं वगळायचं, हा सर्वस्वी संगीतकार विशाल-शेखर आणि निर्माते आदित्य चोप्रा यांचा निर्णय आहे.' असं सुत्रांनी म्हटलं आहे.
'मी सलमान खानचा अपमान केला नव्हता. ही गोष्टी मी त्याला हरतऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा मेसेज करुनही काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे फेसबुकवरुन सार्वजनिकरित्या माफी मागणं हा एकमेव पर्याय दिसत आहे'
असं अरिजीतने आपल्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही पोस्ट अरिजीतने नंतर फेसबुकवरुन डिलीट केली आहे.
'नीता यांच्या घरी मी केवळ तुमची माफी मागण्यासाठी आलो होतो. मात्र तुम्ही ऐकलं नाहीत. काही हरकत नाही. मी इथे सर्वांसमक्ष तुमची माफी मागतो. मात्र मी तुमच्यासाठी सुलतान चित्रपटात गायलेलं गाणं कृपया हटवू नका, अशी नम्र विनंती करतो. तुम्हाला हे गाणं दुसऱ्या गायकाकडून गाऊन घ्यायचं असेल, तर काहीही हरकत नाही, पण हे व्हर्जन राहू द्या.'
असं अरिजीत प्रांजळपणे लिहितो.
'मी खूप गाणी गायली आहेत, मात्र निवृत्त झाल्यावर माझ्या संग्रहात तुमच्यासाठी गायलेलं एक तरी गाणं असावं, अशी माझी इच्छा आहे. प्लीज माझ्या या भावना माझ्याकडून हिसकावू नका. गैरसमजातून का असेना, माझ्यामुळे सलमानला अपमानास्पद वाटलं असेल, तर मी त्यासाठी जाहीर माफी मागतो'
असं अरिजीतने लिहिलं आहे.