Lust Stories : कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांची प्रमुख भूमिका असलेला लस्ट स्टोरीज् हा सिनेमा 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाची बरीच चर्चाही झाली होती. त्याचप्रमाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी देखील पसंती दिल्याचं पाहायला मिळालं होतं. पण या सिनेमातील एक सीन विशेष गाजला. त्याचा परिणाम म्हणजे या सीनमुळे भारतात सेक्स टॉईजच्या विक्रीमध्ये तब्बत 55 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 


या सीनमध्ये कियारा अडवाणीने जे पात्र साकारलं आहे, त्यामध्ये ती व्हायब्रेटर वापरताना दिसते. त्याचप्रमाणे यामध्ये कियाराचं पात्र ते ऑर्गॅजम फील असल्याचे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. त्यानंतर या व्हायब्रेटरची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं धर्मा प्रोडक्शनकडून सांगण्यात आलं. इतकंच नव्हे तर गुगलवरही लोकं ‘Kiara Advani vibrator’ आणि ‘Kiara Advani sex toys’ असं सर्च करु लागले. 


धर्मा प्रोडक्शनी काय म्हटलं?


धर्मा प्रोडक्शनच्या सोमेन मिश्रा यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सहा वर्षांनी त्यांनी त्या सीनमुळे सेक्स टॉईजच्या विक्रीत वाढ झाल्याचं म्हटलं. सोमेन मिश्रा हे धर्मा प्रोडक्शनचे हेड ऑफ डेव्हलपमेंट आहेत. त्यांनी म्हटलं की, कियाराचा तो सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर एक साइट आहे जी एडल्ट टॉइज विकते त्यांच्या वार्षिक सर्व्हेमध्ये असं सांगण्यात आलं की, दोन कारणांमुळे आमच्या विक्रित तुफान वाढ झाली. त्यातलं पहिलं कारण कोविड आणि दुसरं म्हणजे लस्ट स्टोरीज हा सिनेमा. 


पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्या सिनेमानंतर त्यांच्या विक्रीत 50 टक्के ते 55 टक्क्यांनी वाढ झाली. कारण लोकं गुगलवर ‘Kiara Advani vibrator’ आणि ‘Kiara Advani sex toys’  असं सर्च करत होते. त्यावर कंपनीने आम्हाला सांगितलं की, तुम्हाला कल्पनानाही नसेल की, तुमच्या सिनेमामुळे आमच्या व्यवसायात काय बदल झाला. त्यानंतर मी विचार केला की या गोष्टीला माझ्या सीव्हीमध्ये लिहायला हवं. कारण मला कधीही असं वाटलं नव्हतं की, एखादा सिनेमा लोकांच्या आयुष्यावर इतका प्रभाव पाडेल.  फॅशन इंडस्ट्रीवर सिनेमामुळे प्रभाव पडतो ही गोष्ट माहिती होती पण एका व्हायब्रेटर्सच्या बाबतीत असं होईल अशी जराही कल्पना नव्हती. '


ही बातमी वाचा :


Kangana Ranaut : बिग बींसोबत स्वत:ची तुलना, निवडणूक प्रचारादरम्यान कंगना म्हणाली, 'अमिताभ यांच्यानंतर इंडस्ट्रीत मलाच सन्मान'