Salaar Twitter Review:  प्रशांत नील (Prashanth Neel) दिग्दर्शित 'सालार पार्ट 1 - सीझफायर' (Salaar: Part 1 – Ceasefire) हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपाला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासनं (prabhas) प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा  दोन मित्रांवर आधारित आहे. अनेक नेटकऱ्यांनी  चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊयात प्रभासच्या सालार चित्रपटाचा ट्विटर रिव्ह्यू...


नेटकरी सालार पाहिल्यानंतर म्हणाले, "ब्लॉकबस्टर"


सालार या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पहाटे 1 वाजता सुरू झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. यासोबतच लोकांनी सोशल मीडियावर चित्रपटाविषयीचे त्यांचे रिव्ह्यूही शेअर करण्यास सुरुवात केली आहे.एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे,  प्रभासचा अभिनय हा शो स्टिलर आहे आणि दिग्दर्शन टॉप लेव्हल आहे, द रिबेल इज बॅक."






तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,  "हा चित्रपट अॅक्शन मास्टरपीस आहे. सालार चित्रपटात मास अ‍ॅक्शन, जबरदस्त डायलॉग आणि प्रभासची स्टाईल या सर्व गोष्टी आहेत.  हा चित्रपट मनोरंजन करणारा आहे जो चाहत्यांना अधिक आनंद देत आहे."






"रिबेल स्टार प्रभासचा रॉयल कमबॅक जेव्हा प्रभास स्क्रिनवर येतो तेव्हा अंगावर शहारे येतात. त्याच्या करिअरमधील हा बेस्ट चित्रपट आहे." असंही एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे.






 'सलार' हा चित्रपट जगभरात तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभास, श्रुती हासन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 45 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट
 रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई करतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


प्रभासच्या सालार या चित्रपटाला  सेन्सॉरकडून'A' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम  2 तास आणि 55 मिनिटे आहे. 


संबंधित बातम्या:


Salaar trailer Out: "जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए"; प्रभासच्या 'सालार'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज