Salaar Starcast Fees : 'सालार' (Salaar) या बहुचर्चित सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्पावधीतच लाखो व्ह्यूज मिळालेला टीझर सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे. 'सालार' सिनेमाच्या माध्यमातून प्रभास पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केल्याने प्रेक्षकांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.
'सालार'साठी प्रभासने किती मानधन घेतलं आहे? (Prabhas Fees For Salaar)
'सालार' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. 'आदिपुरुष' सिनेमासाठी प्रभासने 100 कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं. पण आता 'सालार' सिनेमासाठी त्याने 100 कोटी रुपये आकारले आहेत. तसेच या सिनेमाला मिळणाऱ्या नफ्याचे 10% प्रभासला मिळणार आहेत.
श्रुती हासन - आठ कोटी
'सालार' या सिनेमात प्रभाससोबत श्रुती हासन स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमासाठी श्रुतीने आठ कोटी रुपये मानधन घेतलं असल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज सुकुरमारन - चार कोटी
'सालार' सिनेमाच्या टीझरमध्ये पृथ्वीराज सुकुमारनची झलक पाहायला मिळाली आहे. या सिनेमात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. टीझरमधील पृथ्वीराजचा लूक अंगावर शहारे आणणारा आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने चार कोटी रुपये मानधन घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.
जगपती बाबू - चार कोटी
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जगपती बाबूदेखील 'सालार' या सिनेमात झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी त्यांनी चार कोटी रुपये आकारले आहेत.
प्रशांत नील - 50 कोटी
'केजीएफ'च्या (KGF) यशानंतर प्रशांत नील यांनी आपल्या मानधनात वाढ केली आहे. 'केजीएफ' सिनेमासाठी त्यांनी फक्त 25 कोटी रुपये आकारले होते. पण आता 'सालार' सिनेमाचं दिग्दर्शन करण्यासाठी त्यांनी आपल्या मानधनात वाढ केली आहे. या सिनेमासाठी त्यांनी 50 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
'सालार' कधी होणार रिलीज? (Salaar Release Date)
प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला.
संबंधित बातम्या