Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाह अली यांच्या जाहिरातीचं सहाय्यक दिग्दर्शन करणारा रणवीर सिंह आज एक दर्जेदार अभिनेता म्हणून लोकप्रिय आहे. गली बॉय, बाजीराव मस्तानी, पद्मावत, सूर्यवंशी असे रणवीरचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. तसेच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या माध्यमातून तो आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो आलिया भट्टसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
रणवीर सिंहचे IMDb वरील 'टॉप 10' सर्वाधिक रेटिंग असलेले सिनेमे जाणून घ्या...
1. गली बॉय (Gully Boy) : 'गली बॉय' या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा जोया अख्तरने सांभाळली आहे. या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.9 रेटिंग मिळाले आहे.
2. 83 : कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.5 रेटिंग मिळाले आहे.
3. लुटेरा (Lootera) : 'लुटेरा' हा सिनेमा 2013 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा आयएमडीबीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून 7.4 रेटिंग मिळाले आहे.
4. बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani) : 'बाजीराव मस्तानी' हा ऐतिहासिक, रोमँटिक सिनेमा 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आयएमडीबी रेटिंगमध्ये या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे.
5. बँड बाजा बारात (Band Baaja Baaraat) : 'बँड बाजा बारात' हा रोमँटिक-विनोदी सिनेमा आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहेत. आयएमडीबीमध्ये या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे.
6. पद्मावत (Padmaavat) : रणवीर सिंहचा 'पद्मावत' हा सिनेमा खूपच गाजला होता. आयएमडीबीच्या शर्यतीत हा सिनेमा सहाव्या क्रमांकावर आहे. या सिनेमाला 7 रेटिंग मिळाले आहे.
7. दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) : रणवीर सिंह, अनिल कपूर, फरहान अख्तर, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा अभिनीत 'दिल धडकने दो' हा सिनेमा खूपच गाजला. आयएमडीबीमध्ये या सिनेमला 7 रेटिंग मिळाले आहे.
8. रामलीला (Ramleela) : 'रामलीला' या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. आयएमडीबीमध्ये या सिनेमाला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
9. सूर्यवंशी (Sooryavanshi) : रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आयएमडीबीमध्ये हा सिनेमा नवव्या क्रमांकावर असून या सिनेमाला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
10. जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) : 'जयेशभाई जोरदार' या सिनेमाला आयएमडीबीमध्ये सहा रेटिंग मिळाले आहेत.
संबंधित बातम्या