Salaar OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजआधीपासून या सिनेमाची जोरदार चर्चा होती. आता रिलीजनंतर या सिनेमाची क्रेझ आणखी वाढली आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
प्रभासच्या 'सालार' या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 'सालार : पार्ट 1-सीजफायर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. 'सालार'आधी प्रभासचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. पण आता वर्षाच्या अखेरीस आलेला 'सालार' मात्र बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.
'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Salaar Box Office Collection)
'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने 90.7 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 17 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. एकंदरीतच रिलीजच्या सहा दिवसांत 'सालार' या सिनेमाने 297.40 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल. तर जगभरात या सिनेमाने 297.40 कोटींची कमाई केली आहे.
'सालार' हा सिनेमा सिनेमागृहात तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी या भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता सिनेमागृहात धमाका केल्यानंतर ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
'या' ओटीटीवर रिलीज होणार 'सालार'
नेटफ्लिक्स इंडियाने 'सालार'चे ओटीटी राईट्स 100 कोटींमध्ये विकत घेतले असल्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा ओटीटीवर येऊ शकतो. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. 'सालार'चं ओपनिंग कलेक्शन शाहरुखच्या पठाण, जवान आणि रणबीरच्या अॅनिमलपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 2023 चा हा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
'सालार'चा पहिला भाग रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. दुसऱ्या भागाचं नाव 'शौर्यंगा पर्व' असं असणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला सालार बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
संबंधित बातम्या