Tadap : सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची भूमिका असलेल्या 'तडप' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट देशभरात 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित या सिनेमाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख या आधीच जाहीर झाली होती. मात्र कोरोना महामारीमुळे या सिनेमाचं प्रदर्शन खोळंबलं होतं. आता मात्र या चित्रपटाची प्रतिक्षा संपत असून नाडियाडवाला प्रोडक्शनने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 


'मोठ्या पडद्यावरीळ ही प्रेमाची जादू पाहण्यासाठी'  साजिद नाडियाडवाला लवकरच 'तडप ' 3 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात सादर करणार आहे. एक अविश्वसनीय अशी  प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे.


अहान शेट्टीने आपल्या ट्विटर अकाउंटवरील सिनेमाच्या नवीन डेटच्या घोषणेचा स्क्रिनशॉट त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून, कॅप्शन मध्ये #Tadap  03/12/21." असं लिहिलं आहे.


 






'तडप' हा तेलुगू हिट रोमँटिक अॅक्शन ड्रामा चित्रपट RX 100 चा रिमेक असणार आहे, ज्यामध्ये  कार्तिकेय गुम्माकोंडा, पायल राजपूत, राव रमेश आणि रामकी हे मुख्य भूमिकेत होते.


अहान शेट्टी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच एक अनोखी व अविश्वसनीय प्रेमकथा घेऊन अहान शेट्टी सोबत अभिनेत्री तारा सुतारीया या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहतच चाहत्यानां या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.


संबंधित बातम्या :