मुंबई : अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां यांनी कोलकात्याच्या रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि आई या दोघांचीही तब्येत व्यवस्थित असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलंय. त्या आधी सकाळी नुसरत जहां यांनी रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता.  


आज सकाळीच नुसरत जहां यांनी आपल्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी आपला एक फोटो शेअर करत त्याखाली ‘डर के ऊपर भरोसा. #positivity #morningvibes’ असं लिहिलं होतं.  


नुसरत जहां या टीएमसीच्या खासदार असून नेहमी चर्चेत असतात. वैवाहिक आयुष्य आणि गरोदरपणाच्या चर्चांमुळं त्यांचं नाव प्रकाशझोतात आलं होतं. 2020 मध्येच नुसरत आणि त्यांचा पती निखिल जैन यांच्यामध्ये सारं काही आलबेल नसल्याची माहिती समोर आली होती. नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात आलेलं वादळ सध्या चर्चेचा विषय ठरत होता. पतीनं आपल्या खात्यातून बेकायदेशीररित्या पैसे काढल्याचं म्हणज लग्नाच्या वेळी नातेवाईकांनी आपल्याला दिलेले दागिनेही हिरावून घेतल्याचा आरोप जहाँ यांनी केला होता. 


पतीवर अनेक गंभीर आरोप करत नुसरत जहाँ यांनी त्यांचा विवाहच अमान्य ठरवला होता. त्यांचा विवाह तुर्कस्तानमध्ये झाल्याने भारतीय कायद्याप्रमाणे त्याला मान्यता नाही. त्यांच्या मागोमाग निखिल जैन यांच्यामार्फतही अनेक खुलासे करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांनी नुसरत जहाँ यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. आम्ही पती-पत्नी  म्हणूनच एकमेकांसोबत राहत होतो, नुसरत यांच्या जवळच्या व्यक्तींनाही ठाऊक आहे की मी त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे असं निखिल जैन यांनी सांगितलं होतं. 


आपल्या पतीपासून वेगळं राहिल्यानंतर नुसरत जहांचं बंगाली अभिनेता यश दासगुप्तासोबत अफेयर असल्याची चर्चा होती.  


संबंधित बातम्या :