मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे 'भूल भुलैया 2' या चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यातच थांबवण्यात आलं होतं. मात्र आता या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईमध्ये पुन्हा सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घेतलेला एक फोटो कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला असून या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात तब्बू आणि कियारा अडवाणी देखील असणार आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कार्तिक आर्यन आणि तब्बू हे दोघेही कूल लूक मध्ये दिसत आहे. शिवाय कॅप्शन मध्ये 'बिगीन अगेन भुल भुलैया 2' असे लिहीत एक घोस्टचा इमोजी तिथे टाकला आहे.
'भूल भुलैया' या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा पुढचा भाग 'भुल भुलैया 2' च्या रुपात पहायला मिळणार आहे. कार्तिक आर्यन सोबत तब्बू आणि कियारा अडवाणी या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कार्तिक व तब्बूच्या इंस्टाग्राम वरील या फोटोला शेअर करताच जवळजवळ साडे नऊ लाखाहून जास्त लाइक्स व कमेंट्स मिळाले आहेत. तसेच बऱ्याच कलाकारांनी व त्यांच्या चाहत्या वर्गाने त्यांचे कौतुक केले आहे. शिवाय हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 रीलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटासाठी सर्वचजण खूप उत्सुक आहेत.
'धमाका' सिनेमातही दिसून येणार 'कार्तिक आर्यन'
करण जोहर निर्मित 'दोस्ताना 2' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार होता. मात्र काही वादामुळे या चित्रपटात काम करणार नसल्याचे समोर आले आहे. तरीही कार्तिकच्या हातात 'धमाका' हा चित्रपट आहे. यातून तो लवकरच डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'फ्रेडी' या चित्रपटातून कार्तिक आर्यन सोबत अलाया एफ
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री आलया एफचा केक कापताना चा फोटो शेअर केला होता. त्या फोटोतील कॅप्शन मध्ये कार्तिकने 'वेलकम फ्रॉम फ्रेडी' असे लिहिले होते. कार्तिक आर्यन ने या या चित्रपटाचेही चित्रीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे.
संबंधित बातम्या :
- Abhishek Bachchan Injured: अभिषेक बच्चन जखमी झाल्यानंतर रुग्णालयात दाखल; अमिताभ आणि बहीण श्वेता नंदा भेटण्यासाठी मध्यरात्रीच पोहोचल्या
- Spider-Man: No Way Home Trailer: स्पायडर मॅन: नो वे होम चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; जबरदस्त अॅक्शन व्हिडिओ पहा
- Alexa बोलणार आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजात, अॅमेझॉनची नवी सेवा लॉन्च