Drugs Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चार वर्षापूर्वीच्या ड्रगशी संबंधित प्रकरणात टॉलीवूड स्टार्स आणि दिग्दर्शकांसह 12 लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, रवी तेजा आणि राणा दग्गुबतीसह 12 लोकांना चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरला रकुल प्रीत सिंगला, 8 सप्टेंबरला राणा दग्गुबतीला, 9 सप्टेंबरला रवी तेजाला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


2017 मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख रुपयांची ड्रग्स जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. यापैकी 11 प्रकरणांमध्ये अमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणाच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रकुल प्रीत सिंहचीही चौकशी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबई एनसीबीने त्याची चौकशी केली होती.