Laapata Ladies Trailer: आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखालीबनलेल्या 'लापता लेडीज' ( Laapata Ladies Trailer) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट किरण रावनं दिग्दर्शित केला आहे. 'लपता लेडीज' या चित्रपटात नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...


'लपता लेडीज'चा ट्रेलर रिलीज


 किरण रावने सोशल मीडियावर 'लपता लेडीज' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यासोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'घूंघट उठ चुके हैं, 'लपता लेडीज' चा ट्रेलर आला आहे! BMS ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमची तिकिटे आत्ताच प्री-बुक करा.'


कधी रिलीज होणार 'लपता लेडीज'?


'लपता लेडीज' या चित्रपटाची कथा दोन नववधूंभोवती फिरते. ट्रेलरची सुरुवात वधूच्या घरात प्रवेश करण्यापासून होते, परंतु जेव्हा ती वधू घूंघटवर करते पण त्यानंतर लक्षात येतं की खरी ही नाहीये. त्यानंतर त्या नववधूंचा पती पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवतो. या चित्रपटात अभिनेता रवी किशन याने पोलिसाची भूमिका साकारली असून ट्रेलरमध्ये त्याचा दमदार अभिनय दिसत आहे. हरवलेल्या वधूचा शोध घेण्यासाठी पोलीस काय काय करतात? हरवलेली वधू सापडते का? हे सगळं जाणून घेऊण्यासाठी प्रेक्षकांना 'लपता लेडीज' हा चित्रपट बघावा लागणार आहे. 'लपता लेडीज' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका बघायला मिळत आहे. 'लपता लेडीज' यावर्षी 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.


पाहा ट्रेलर:






'लपता लेडीज' ची स्टार कास्ट


बिप्लब गोस्वामी यांच्या कथेवर आधारित 'लपता लेडीज' हा चित्रपट 2023 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये प्रदर्शित करण्यात आला. 'लपता लेडीज' ला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. या चित्रपटात नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्याशिवाय प्रतिभा रंता, छाया कदम आणि रवी किशन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Sanjay Leela Bhansali: संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा; आलिया, रणबीर आणि विकी साकारणार भूमिका