Kajol, Nysa Devgan Trolled PHOTO: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोल (Kajol) आणि तिची मुलगी न्यासा (Nysa Devgan) नेहमीच चर्चेत असतात. आता काजोलनं तिच्या 21 वर्षांच्या मुलगीसोबतचा एक नवा फोटो शेअर केला आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेहमीप्रमाणेच न्यासा देवगण ट्रोल झाली. काजोलनं शेअर केलेला फोटो पाहून फॅन्स आश्चर्यचकित झाले. नेटकऱ्यांचं म्हणनं आहे की, नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये काजोल तिच्या मुलीपेक्षा लहान दिसते, याचं त्यांना आश्चर्य वाटतंय.
काजोलनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची मुलगी न्यासा देवगणसोबत दिसत आहे. दोघी मायलेकी एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. काजोलनं स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. काजोलनं फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, "एका शेंगेत दोन वाटाणे किंवा एका डब्यात दोन चॉपस्टिक्स." काजोलनं फोटोसोबत #unbreakablebond #partnerincrime हे हॅशटॅग्सही वापरले आहेत. काजोलनं शेअर केलेला फोटो आणि त्यासोबतच्या कॅप्शनवर लोक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
या फोटोमधल्या दोघींच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, काजोल आणि तिची लेक न्यासा दोघीही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत आणि दोघी एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. दरम्यान, हा फोटो पाहून लोक काजोल तिच्या मुलीपेक्षाही लहान दिसते, असं म्हणत आहेत. तर, अनेकजण पुन्हा एकदा न्यासाला तिच्या लूक्सवरुन ट्रोल करत आहेत.
नेटकरी पोस्टवर तुटून पडले
काजोल आणि न्यासाच्या फोटोवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, "काजोल आपल्या मुलीपेक्षा लहान दिसते, OMG...", दुसऱ्या एका युजरनं लिहिलं आहे की, "काजोल लेकीपेक्षा फारच लहान दिसतेय." आणखी एका चाहत्यानं कमेंट केली आहे की, "काजोल खरंच 20 वर्षांची दिसतेय... तू कसं करतेयस?", तर दुसऱ्यानं लिहिलं की, "बडी बहीण आणि छोटी बहीण असं वाटतंय..."
21 वर्षांची आहे न्यासा, परदेशात झालंय शिक्षण
काजोल सध्या 50 वर्षांची आहे. 24 फेब्रुवारी 1999 रोजी तिनं अजय देवगणशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत, न्यासा आणि युग. न्यासा सध्या 21 वर्षांची आहे. न्यासानं मुंबईतील धीरूभाई अंबानी शाळेत शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर ती पुढील शिक्षणासाठी सिंगापूरला गेली. तिनं स्वित्झर्लंडमधील एका महाविद्यालयातून शिक्षणही घेतलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :