Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर, दुसरीकडे त्याच्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या आगामी चित्रपटाचा टीझर देखील चर्चेत आहे. या चित्रपटातील सैफचा लूक खूप ट्रोल होत आहे. तर, टीझरवरून अनेक वाददेखील निर्माण झाले आहेत. मात्र, या वादादरम्यानच आता सैफचं नवं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सैफ म्हणला की, त्याला महाभारतातही भूमिका साकारायची आहे.


सैफ अली खानने नुकतीच ’महाभारता’त काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्याने सांगितले की, 1999मध्ये आलेल्या 'कच्चे धागे' या चित्रपटापासून तो अभिनेता अजय देवगणशी याबद्दल चर्चा करत आहेत. यावेळी त्याने महाभारतातील त्याचे आवडते पात्र कोण आहे, हेही त्यांनी सांगितले.


महाभारतात काम करायचंय पण...


सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, रामायणावर आधारित 'आदिपुरुष' नंतर आता त्याला 'महाभारत'वर (Mahabharat) आधारित चित्रपटात काम करायचे आहे. तो म्हणाला की, जर कोणी 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारखे महाभारत बनवले, तर मला त्यात काम करायला आवडेल. इतकंच नाही, तर सैफ अली खानने तर असंही म्हटलं आहे की, हा चित्रपट बॉलिवूडमध्ये बनवला जाऊदे किंवा साऊथमध्ये, त्याला महाभारतावर आधारित चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल. मुलाखतीदरम्यान सैफने महाभारतातील कोणते पात्र साकारण्यास उत्सुक आहे हे देखील सांगितले.


या मुलाखतीदरम्यान सैफ म्हणाला की, त्याला महाभारतात काम करण्याची इच्छा खूप पूर्वीपासून होती. 'कच्चे धागे' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेपासून तो अजय देवगणसोबत महाभारतावर आधारित चित्रपटाविषयी बोलत आहे. तर, महाभारतातील आवडत्या पात्राबद्दल बोलताना सैफ म्हणाला, महाभारतात मला कर्ण खूप प्रभावी वाटतो, इतरही अनेक पात्रे आहेत, ज्यांनी मी खूप प्रभावित झालो आहे.


महाभारतातील भूमिका ड्रीम रोल!


या मुलाखतीत जेव्हा सैफला त्याच्या ड्रीम रोलबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले की, 'मला नाही वाटत अशी कोणती भूमिका असते. मी फक्त मला काय ऑफर केले आहे, याचा विचार करतो. माझा कोणताही एक असा ड्रीम रोल नाही. असा विचार करण्यात काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही. तरीही जर कोणी ते 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' सारखे ‘महाभारत’ केले तर, मला महाभारतात काम करायला आवडेल, असे सैफ आली खान म्हणाला.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: